News Flash

अ‍ॅमॅझॉन, फ्लिपकार्टची माघार

देशात स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न गंभीर असतानाच अ‍ॅमॅझॉन व फ्लिपकार्ट या इ-विक्री करणाऱ्या कंपन्यांनी लिंगनिश्चितीबाबत माहिती देणाऱ्या पुस्तकांची विक्री सुरू केली आहे.

| February 14, 2015 02:05 am

देशात स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न गंभीर असतानाच अ‍ॅमॅझॉन व फ्लिपकार्ट या इ-विक्री करणाऱ्या कंपन्यांनी लिंगनिश्चितीबाबत माहिती देणाऱ्या पुस्तकांची विक्री सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेव्ह गर्ल चाइल्ड’ मोहीम राबवली असतानाच आता या दोन कंपन्यांनी ही वादग्रस्त पुस्तकांची विक्री सुरू केली आहे. अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट यांनी ही बाब लक्षात येताच ही पुस्तके विक्रीतून काढून टाकली आहेत.
अ‍ॅमॅझॉन इंडियाने ‘हाऊ टू डिटरमाइन द सेक्स ऑफ युवर बेबी- फन वेज टू ट्राय टू प्रेडिक्ट द सेक्स ऑफ युवर अनबॉर्न बेबी’ हे पुस्तक विक्रीस ठेवले आहे. फ्लिपकार्टने ‘हाऊ टू चूज द सेक्स ऑफ युवर बेबी’ हे पुस्तक विक्रीस ठेवले आहे. या पुस्तकांमध्ये विशिष्ट लिंगाचे मूल जन्माला घालणे किंवा लिंगनिश्चिती करण्याचे मार्ग सांगितले आहेत.
फ्लिपकार्टने सांगितले की, आमच्या विक्रेत्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे पाळणे गरजेचे आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. आम्हाला आमच्या कंपनीच्या वस्तू विक्रीवर नकारात्मक प्रतिसाद नको आहे. अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्तयाने सांगितले की, स्थानिक कायदे व नियमांचे उल्लंघन वस्तू विक्रीच्या व्यवहारात होऊ नये यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 2:05 am

Web Title: amazon flipkart selling books on sex determination
Next Stories
1 दक्षिण दिल्लीमध्ये ख्रिश्चन शाळेवर अज्ञात व्यक्तींचा हल्ला
2 भारतीयास मारहाणप्रकरणी पोलिसास अटक
3 शपथविधीपूर्वी नोकरशहा कामाला!
Just Now!
X