“जेव्हा जेव्हा मी भारतात येतो तेव्हा मी नव्याने भारताच्या प्रेमात पडतो. अफाट ऊर्जा, संशोधक वृत्ती आणि हिंमत मला प्रेरणा देते,” असं मत अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी व्यक्त केले आहे. आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने भारतातील लघू व मध्यम उद्योगाच्या प्रोत्साहनार्थ तब्बल एक अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा बुधवारी केली. बेझोस हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्याचसंदर्भात बेझोस यांनी भारतीयांसाठी एक खास पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. बेझोस यांचे पत्र जसेच्या तसे…

भारतामधील ५ लाख ५० हजार हून अधिक लहान मोठे उद्योजक अ‍ॅमेझॉन डॉट इनवरुन व्यवसाय करतात. ‘कारागीर’ आणि ‘सहेली’ या उपक्रमांच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक आणि कारागीर अ‍ॅमेझॉनशी जोडले गेलेले आहेत. मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार झालेले ६० हजार उद्योगांशी संबंधित वस्तू आज परदेशात पाठवल्या जात आहेत. भारतामधून एक अब्ज डॉलरहून अधिक किंमतीची माल निर्यात केला जात आहे.

भारतामधील लाखो अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर मोफत आणि जलग प्रोडक्ट डिलेव्हरीचा तसेच जाहिरातविरहीत ऑनलाइन स्ट्रीमींगचा आनंद घेत आहेत. अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि खास करुन अ‍ॅमेझॉन ऑरिजनल्स अंतर्गत बनवण्यात आलेल्या ‘मिर्झापूर’ आणि ‘द फॅमेली मॅन’ अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘अ‍ॅलेक्सा’लाही आता हिंदी बोलता येत आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये ‘अ‍ॅलेक्सा’ आज ३० हजारहून अधिक सूचनांचे पालन करते. यामध्ये अगदी योगापासून ते पंचतत्रच्या गोष्टी सांगण्यापर्यंतची कामे ‘अ‍ॅलेक्सा’ करते.

अ‍ॅमेझॉन ही अशी पहिली कंपनी आहे जीने शाश्वत वाढ लक्षात घेऊन वातावरण बदलासंदर्भातील करार मान्य केला आहे. पॅरीस हवामान करारातील सर्व अटी आणि शर्थी मान्य करणारा हा करार आहे. पुनर्वापर न होणारे प्लास्टिक भारतामधून हद्दपार करण्याची घोषणा आम्ही केली आहे. आम्ही आमच्या व्यवसायामधून जून २०२० पर्यंत हे साध्य करु. तसेच या वर्षी आम्ही आमचे प्रोडक्ट डिलेव्हर करण्यासाठी दहा हजार इलेक्ट्रीक रिक्षा सुरु करणार आहोत.

जेव्हा जेव्हा मी भारतात येतो तेव्हा मी नव्याने भारताच्या प्रेमात पडतो. अफाट ऊर्जा, संशोधक वृत्ती आणि हिंमत मला प्रेरणा देते. भारतामधील लहान शहरे आणि गावांमधील लहान उद्योजकांना वाव मिळावा म्हणून आम्ही भारतामध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहोत हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. २०२५ पर्यंत एक कोटी लहान व्यावसायिकांना तंत्रस्नेही मंचावर आणून त्यांनी तयार केलेल्या वस्तू परदेशात निर्यात करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही केलेल्या गुंतवणूकीमुळे देशामध्ये २०२५ पर्यंत १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा आम्हाला विश्वास आहे.

– जेफ बेझोस
संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, अ‍ॅमेझॉन