News Flash

सेल्फी छायाचित्रांच्या मदतीने अ‍ॅमेझॉनमधील जैवविविधतेचे दर्शन

वैज्ञानिकांनी प्राण्यांच्या सेल्फींचा संग्रह केला असून त्यामुळे अ‍ॅमेझॉनमधील विषुववृत्तीय पर्जन्यवनातील जैवविविधता त्यातून स्पष्ट झाली आहे.

| April 25, 2016 12:06 am

वैज्ञानिकांनी प्राण्यांच्या सेल्फींचा संग्रह केला असून त्यामुळे अ‍ॅमेझॉनमधील विषुववृत्तीय पर्जन्यवनातील जैवविविधता त्यातून स्पष्ट झाली आहे. यात आतापर्यंत कुणी न पाहिलेली चित्रे आहेत. ‘फील्ड म्युझियम’ या अमेरिकेतील संस्थेने पेरूतील अ‍ॅमेझॉन जंगलात १७ दिवस राहून या छायाचित्रांचा संग्रह केला आहे. ही छायाचित्रे ड्रोन व चलत कॅमेऱ्याने काढली आहेत. १४ फिरते कॅमेरे व ड्रोनचा वापर यात केला असून हवेतून पर्जन्यवनांचे चित्रण करण्यात आले आहे. त्या जंगलातील जैवविविधता त्यातून दिसून आली आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलाचे असे चित्र कधीच सामोरे आले नव्हते. यात ओसेलॉटस (लहान बिबटय़ा), जायंट आर्माडिलॉस, कुरसॉच, जायंटअँट इटर्स, टॅपिर्स, पेकनिस, पॅकस यांचा समावेश आहे.

द फील्ड म्युझियमचे भौगोलिक माहिती व्यवस्था तज्ज्ञ जॉन मार्केल यांनी सांगितले, की आतार्प्यत कुणाही वैज्ञानिकांनी अ‍ॅमेझॉनचा हा भाग पाहिलेला नव्हता. अत्यंत दूरस्थ व अस्पर्शित असा हा भाग असून तेथे प्राण्यांच्या भिन्न प्रजाती आढळून आल्या आहेत. यात वनस्पती, मासे, उभयचर, सरीसृप, पक्षी, सस्तन यांच्या १८६० प्रजाती दिसून आल्या असून विज्ञानाला नवीन असलेल्या १९ प्रजातींचा यात समावेश आहे. अनेक प्रकारचे बेडूक, साप, वन्यजीवांसाठी उपयोगी असलेली मातीची मिठागरे यात सापडली आहेत. नऊ स्थानिक गटासंह मोठय़ा पथकाने यात काम केले असून त्यात तेथील प्राणी, वनस्पती, जलचर सृष्टी यांचा वेध घेतला आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात बेकायदा खाणकाम व लाकूडतोड चालू असून तेथे रस्तेही काढण्यात आले आहेत. तेथील जैववैविध्य बघितल्याशिवाय आतापर्यंतच्या तस्करीत नेमके काय नष्ट झाले आहे हे सांगता येणार नसल्याचे द फील्ड म्युझियमचे संचालक कोरिन व्हायरेनडोर्प यांनी सांगितले. ते म्हणाले, की आम्ही सेल्फीच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉनच्या जंगलाचा जो भाग पाहिला आहे, तो अजून माणसाच्या कृतींपासून अलिप्त आहे. गेली अनेक शतके तेथे माणसांना पोहोचता आले नाही. ही जैवविविधता आम्ही कॅमेऱ्यातून पाहिली पण ती तशीच कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:06 am

Web Title: amazon river photography
Next Stories
1 अमेरिकेतील भारतीय कामगारांचे भाषेचे आकलन कमी – लेपेज
2 हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाईची अमेरिकेची पाकला सूचना
3 बांगलादेशातील प्राध्यापकाच्या खूनप्रकरणी एक ताब्यात
Just Now!
X