भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची थेट लंकेच्या रावणाशी तुलना केल्याने मागासवर्गीय कल्याणमंत्री अंबिका चौधरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बिहामधील बैरिया येथे एका जाहीर सभेत अंबिका चौधरी म्हणातात की, जसा लंकेचा रावण घमेंडी होता त्याच स्वभावाचे नरेंद्र मोदी सुद्धा आहेत. नरेंद्र मोदींशी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यांच्याशी कोणत्याही प्रकारे तुलना होऊ शकणार नाही. असेही त्यांनी म्हटले.
अंबिका चौधरींच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी स्थानिक भाजप नेते अंबिका चौधरींविरुद्ध न्यायालयात तक्रार करणार असल्याचेही समजते. त्यामुळे लंकेच्या रावणाशी नरेंद्र मोदींची केलेली तुलना अंबिका चौधरींना महागात पडण्याची चिन्हे आहेत.