जभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसल्याचं दिसत आहे. तसंच अमेरिकेतील करोनाबिधितांच्या संख्येनं ४५ लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती समोर आली. तर दुसरीकडे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत करोनामुळे तब्बल दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहितीदेखील समोर आली.

तर दुसरीकडे वर्ल्डोमीटरनं दिलेल्या माहितीनुसारही अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून मृतांची संख्याही दीड लाखांवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत आतापर्यंत १ लाख ५३ हजार ४४७ जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत १ हजार २६७ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५० हजार नव्या रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे.

अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये सर्वाधिक मृत्यू

करोनाचा सर्वाधित फटका बसलेल्या देशांच्या यादीत ब्राझिल हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत २५ लाख करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे ९० हजार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ब्राझिलमध्ये १ हजार ५०० जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

२१ औषधांची ओळख

करोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यायोग्य असलेल्या २१ औषधांची शास्त्रज्ञांनी ओळख पटवली आहे. या औषधांचा वापर करोनाच्या उपचारात फादेशीर ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापैकी काही औषधांचा वापर कुष्ठरोगींवर, तसंच कर्करोगावर प्राथमिक उपचारांच्या स्वरूपात करण्यात येत असल्याचं समोर आलं आहं. तसंच यापैकी १३ औषधं चाचणीच्या पहिल्या टप्प्यात यशस्वी झाली आहेत.