चीनचे बंडखोर नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक लिऊ क्षिआओबो यांच्या पत्नी लिऊ क्षिआ यांची स्थानबद्धतेतून सुटका करावी अशी मागणी अमेरिकेने चीनकडे केली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून लिऊ क्षिआ यांना चीन सरकारने त्यांच्या बीजिंग येथील निवासस्थानी स्थानबद्ध करून ठेवले आहे. तर लिऊ क्षिआबाओ तुरुंगात आहेत.  क्षिआ यांच्या भावावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले असून त्यांच्यावर खटला सुरू आहे. या खटल्याच्या कामकाजानिमित्त क्षिआ यांची साक्ष घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी ‘मी मुक्त नाही’ असा ओरडा केला. त्यानंतर मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांची तातडीने उचलबांगडी केली. याची दखल घेत परराष्ट्रखात्याचे प्रवक्ते पॅट्रिक व्हेन्ट्रेल यांनी क्षिआ यांची चीनने सुटका करावी अशी मागणी केली.