21 September 2020

News Flash

अमेरिकेकडून हिज्बुल मुजाहिद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित

अमेरिकेच्या निर्णयामुळे पाकिस्तानला झटका

हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दीन

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इमिग्रेशन अँड नॅशनलिटी अॅक्ट अंतर्गत हिज्बुल मुजाहिद्दीनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. संघटनेचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनला जागतिक दहशवादी घोषित केल्यानंतरच्या दोनच महिन्यांनंतर अमेरिकेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यामुळे वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना उजेडात आणणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे.

अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे अमेरिकेतील संघटनेच्या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे. त्यामुळे हिज्बुलच्या सर्व हालचालींवर आता निर्बंध येणार आहेत. याशिवाय या दहशतवादी संघटनेत कोणालाही सामीलदेखील होता येणार नाही. अमेरिकेच्या निर्णयामुळे हिज्बुलची मोठी कोंडी झाली आहे. १९८९ मध्ये स्थापन झालेली ही दहशतवादी संघटना अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करते आहे. या संघटनेचे अनेक दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रीय आहेत.

अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनच्या नाड्या आवळल्यामुळे अमेरिकेतील संघटनेची संपूर्ण संपत्ती जप्त केली जाईल. याशिवाय या संघटनेसोबत कोणतेही व्यवहार न करण्याचे आवाहन अमेरिकेन सरकारकडून नागरिकांना करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीआधीच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिज्बुलचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. यामुळे अमेरिकन नागरिकांना सय्यद सलाहुद्दीनसोबत आर्थिक व्यवहार करता येण्यावर निर्बंध आले.

हिज्बुल मुजाहिद्दीन काश्मीरमधील जुनी दहशतवादी संघटना आहे. सय्यद सलाहुद्दीनकडून चालवल्या जाणाऱ्या या संघटनेने एप्रिल २०१४ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यात १७ लोक जखमी झाले होते. काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हिज्बुलच्या दहशतवाद्यांचा सहभाग असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 9:30 pm

Web Title: america designates pakistani terrorist group hizbul mujahideen as foreign terrorist organization
Next Stories
1 केंद्रीय प्रशासनात तीन मोठी पदे रिक्त; सरकारकडून योग्य उमेदवारांसाठी ठराविक निकष निश्चित
2 लडाखमधील घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारत, चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक होणार
3 एअर इंडियाच्या हवाईसुंदरीचे निलंबन; धावपट्टीवर विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने कारवाई
Just Now!
X