12 July 2020

News Flash

तेलाच्या खेळात भारतामुळे अमेरिकेच्या तिजोरीला ‘अच्छे दिन’

अमेरिकेने इराणवर निर्बंध घालून सर्व मित्र राष्ट्रांना इराणबरोबरचे व्यवहार संपवण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी असला तरी यामध्ये अमेरिकेचे सर्वाधिक आर्थिक फायदा

प्रतीकात्मक छायाचित्र

अमेरिकेने इराणवर निर्बंध घालून सर्व मित्र राष्ट्रांना इराणबरोबरचे व्यवहार संपवण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी असला तरी यामध्ये अमेरिकेचे सर्वाधिक आर्थिक फायदा होत आहे. इराणकडून तेल आयात बंद करण्यासाठी अमेरिकेने दबाव आणल्यानंतर भारताने आता अमेरिकेकडून तेल आयात वाढवली आहे.

यावर्षी जून महिन्यात अमेरिकेने भारताला कच्चा तेलाची विक्रमी निर्यात केली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत अमेरिकेने भारताला दुप्पट कच्चा तेलाची निर्यात केली आहे. अमेरिकेतील तेल उत्पादक जुलै महिन्यापासून १५ मिलियन बॅरलपेक्षा जास्त कच्चा तेलाची निर्यात भारताला करणार आहेत. २०१७ साली हीच निर्यात आठ मिलियन बॅरल होती.

अमेरिकेतून आयात होणाऱ्या सामनावर चीनने कर वाढवला तर भारत अमेरिकेकडून कच्चा तेलाची आयात वाढवू शकतो. कारण चीनने करवाढ केली तर अमेरिका कच्चा तेलाच्या किंमती आणखी कमी करेल. मे च्या तुलनेत जून महिन्यात भारताने इराणकडून तेल आयात १६ टक्क्याने कमी केली आहे. आशियाई देशांनी आता तेल आयातीसाठी इराणऐवजी अमेरिकेकडे मोर्चा वळवला आहे.

अमेरिकेचे ऐकाल तर परिणाम भोगावे लागतील
चाबहार बंदराबाबत झालेल्या करारानुसार गुंतवणूक न केल्यास आणि कच्चे तेल आयातीत कपात केल्यास भारताला परिणाम भोगावे लागतील असा इशारा इराणने भारताला दिला आहे. अमेरिकेच्या दबावात येऊन जर भारताने तेल आयात कपात केली तर त्यांना देण्यात आलेला विशेषाधिकाराचा दर्जा काढून घेण्यात येईल अशी थेट धमकीवजा इशारा इराणने दिला आहे. एकीकडे अमेरिकाचा दबाव आणि दुसरीकडे इराणचा इशारा यामुळे भारत कात्रीत सापडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर केंद्र सरकार कसा तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तेल उत्पादक देशांना दिला इशारा
कच्चा तेलाच्या किंमती कमी करा किंवा तेल खरेदी कमी करावी लागेल असा इशारा भारताने ओपेक या तेल उत्पादक देशाच्या संघटनेला दिला आहे. कच्चा तेलाची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. भारतातील सर्वात मोठी तेल रिफायनरी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे चेअरमन संजीव सिंह म्हणाले कि, मागच्या दीड महिन्यात कच्च तेलाचे दर ज्या गतीने वाढली तीच गती कायम राहिली तर भारतीय ग्राहक इलेक्ट्रीक वाहने, गॅस अशा कमी खर्चाच्या पर्यायांकडे वळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2018 6:36 pm

Web Title: america get benefit from sanction on iran oil import india iran
Next Stories
1 FB बुलेटीन: महाविद्यालयांमध्ये गीतेचे वाटप, धुळ्याचे व्हायरल सत्य आणि इतर महत्त्वाच्या बातम्या
2 उत्तराखंडमध्ये पूजाऱ्यांना मागासवर्गीयांच्या घरी पूजेला नाही नकार देता येणार
3 दारुबंदीवरुन नितीशकुमारांचा ‘यू टर्न’, कायदा केला सौम्य
Just Now!
X