अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने इराण, इराक, ओमान आणि इराण-सौदी अरेबियाच्या सागरी हद्दीतून अमेरिकन प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून FAA कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन तळांवर बारापेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. मध्य आशियात वाढलेला राजकीय तणाव आणि लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने हा निर्णय घेतला आहे. अमेरिका वगळता अन्य देशांच्या प्रवासी विमानांची या भागातून उड्डाणे सुरु आहेत. एफएएच्या बंदीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. पण अन्य देश सुद्धा FAA चा सल्ला गांभीर्याने घेतात.

फेडरल एव्हिएशनने ताजा निर्णय घेण्याआधीच अमेरिकन प्रवासी विमान कंपन्यांना इराक, इराण, ओमान या भागातून २६ हजारफुटापेक्षा कमी उंचीवरुन उड्डाण करण्यास मनाई केली होती. जूनमध्ये इराणने अमेरिकेचे टेहळणी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. इराकमधील अमेरिकन तळावरील हल्ल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेडने इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – इराणचा अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला; ३० सैनिक मारल्याचा दावा

काय घडलं?
इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इरबिल, अल असद आणि ताजी या लष्करी हवाई तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकेनं आखाती देशात जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – All is well! इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट

काय आहे ट्रम्प यांच टि्वट
इराणकडून अमेरिकेच्या लष्करी हवाईतळांवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत सगलं काही आलबेल असल्याचं सांगत सूचक वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या सुरुवातीलाच ऑल इज वेल असं म्हटलं आ