27 September 2020

News Flash

“नेव्हर अंडरएस्टिमेट हिम…”

ट्रम्प यांनी किम जोंग यांच्याबद्दल केला दावा

गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत अनेक वृत्त समोर आली होती. किम जोंग उन हे कोमाममध्ये असल्याताचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला होता. तसंच देशाची सूत्रं त्यांच्या बहिण्याच्या हाती सोपवली जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. परंतु त्यानंतर किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगत एका बैठकीचं छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दल एक दावा केला आहे. किम जोंग यांची प्रकृती ठिक असल्याचं ते म्हणाले आहेत.

“किम जोंग उन यांना कधीही कमी लेखू नका, त्यांची प्रकृती ठिक आहे,” असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकात त्यांचं वक्तव्य छापण्यात आलं होतं. त्या वक्तव्याची चर्चा असतानाच ट्रम्प यांचं हे ट्विट समोर आलं आहे. “किम यांनी मला सर्वकाही सांगितलं होतं आणि त्यांनी आपल्या नातेवाईकांची हत्या कशाप्रकारे केली होती हेदेखील सांगितलं होतं,” असं ट्रम्प यांच्या हवाल्यानं पत्रकार बॉब वुडलक्ड यांनी आपलं पुस्तक ‘रेंज’मध्ये नमूद केलं आहे.

वुडवर्ड यांनी बुधवारी आपल्या पुस्तकातील काही भाग प्रकाशित केला होता. वुडवर्ड यांना ट्रम्प यांनी दिलेल्या १८ मुलाखतींच्या आधारावर हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे. या पुस्तकातील काही भाग ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. वुडवर्ड हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे संपादक आहेत. त्यांचं ‘रेंज’ हे पुस्तक १५ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात करोना विषाणूचा प्रादुर्भाव, उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन आणि एका रहस्यमय हत्याराचा उल्लेख करण्यात आला आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा सिंगापुरमध्ये किम जोंग उन यांची ट्रम्प यांनी भेट घेतली तेव्हा ट्रम्प यांच्यावर किम जोंग यांचा प्रभाव पडल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 9:23 am

Web Title: america president donald trump speaks about north korea leader kim jong un never underestimate him twitter jud 87
Next Stories
1 उत्तर प्रदेश : राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक प्रकरणं गोहत्येसंदर्भातील
2 कंगनाची आई भाजपात, मोदी-अमित शाह यांचे मानले आभार
3 करोनाचा प्रादुर्भाव संपला; रॅलीदरम्यान भाजपा नेत्याचा दावा
Just Now!
X