अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दुसर्‍या महायुद्धात भारतात चारशेहून अधिक बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी गांधीनगरमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (एनएफएसयू) कडे हातमिळवणी केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाअंतर्गत काम करणारी आणखी एक संस्था डीपीएएला एनएफएसयूचे तज्ञ मदत करतील.

डीपीएए ही एक संघटना आहे जी युद्धाच्या वेळी गहाळ झालेल्या आणि पकडलेल्या सैनिकांची माहिती ठेवते. एनएफएसयू येथील डीपीएएचे मिशन प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. गार्गी जानी म्हणाल्या, “अमेरिकेच्या बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.”

डॉ. गार्गी म्हणाल्या, “दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध, शीत युद्ध आणि इराक आणि पर्शियन आखाती युद्धांसह अमेरिकेच्या मागील संघर्षात बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधले जातील. तसेच ओळख पटवून परत आणले जातील.”

“८१, ८०० अमेरिकन सैनिक दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध आणि शीत युद्ध दरम्यान बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी ४०० सैनिक लोक भारतात बेपत्ता झाले. एनएफएसयू या मोहिमेमध्ये डीपीएएला वैज्ञानिक आणि तार्किकदृष्ट्या सर्व शक्य मदत करेल,” डॉ. गार्गी म्हणाल्या.