‘धटासी आणावा धट उद्धटासी उद्धट’ या न्यायाने अमेरिकेने मुंबई हल्ल्यात २००८ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या नऊ अमेरिकी व इस्रायली व्यक्तींच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानमधील जमात-उद-दवा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्यासह हा हल्ला करणाऱ्यांकडे ६८.८ कोटी डॉलरची भरपाई मागितली आहे. पाकिस्तानात या खटल्याच्या नेहमीच्या कामकाजात गेली सहा वर्षे केवळ चालढकल चालू असताना भारताला मात्र त्याबाबत कठोर भूमिका घेता आलेली नाही.
हल्ल्यात लष्कर ए तय्यबाने सात जणांना क्रूरपणे ठार केले होते व इतर दोघांना जखमी केले होते. त्यांच्या नातेवाइकांनी भरपाई मागितली आहे. २६ नोव्हेंबर २०११ रोजी मुंबईत हा हल्ला झाला होता. त्याबाबत पहिला खटला इस्रायली नागरिकांच्या कुटुंबीयांनी १९ नोव्हेंबर २०१० मध्ये दाखल केला होता. त्यांनी आयएसआय व त्यांच्या प्रमुखाविरुद्ध कारवाईची मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली कारण ते आयएसआय हा परदेशी सरकारचा भाग असल्याने त्यांना राजनैतिक सुरक्षा आहे. न्यायालयाच्या कागदपत्रानुसार लष्कर-ए-तय्यबा व इतर आरोपींना न्यायालयाने समन्स पाठवले आहे पण आरोपींना उत्तर देता आलेले नाही. २००८ च्या मुंबई हल्ल्यात राबी नॅचमन व त्याचे वडील गॅव्हरियल होल्झबर्ग मारले गेले होते. त्यांच्या वतीने मोझेस श्वार्झब्लाट व मरिबेथ जेसवानी खटला लढवत आहेत. अँड्रीयना व्हॅरागोन या हल्ल्यात उजव्या हाताला व पायाला गोळी लागून जखमी झाली होती, तिनेही खटला भरला आहे.

जमात उद दवाचा प्रमुख हाफिझ सईद व लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झाकी-उर-रहमान लखवी, साजीद माजीग, आझम चिमा व इतर दोन पाकिस्तानी नागरिक मेजर इक्बाल व मेजर समीर अली यांच्या विरोधात खटला तर चालवण्यात यावा, शिवाय त्यांनी निष्पाप अमेरिकी व इस्रायली लोकांचे प्राण घेतल्याबद्दल भरपाई द्यावी, असे न्यूयॉर्क न्यायालयात ३० व ३१ ऑक्टोबरला सांगण्यात आले. सरकारी वकिलांच्या मते न्यायाधीशांमार्फत सुनावणी घेण्यात यावी व इस्टर्न डिस्ट्रिक्ट न्यायालयात १ नोव्हेंबर २०१३ पूर्वी ६८.८ कोटी रुपये भरपाई पोटी द्यावेत. न्यायालयाचे समन्स जमात-उद-दावा व लष्कर-ए-तय्यबा व इतर आरोपींना समन्स पाठवले असून अजून त्याचे उत्तर मिळालेले नाही.

मुंबई हल्ल्यात १६६ ठार तर ३०० जण जखमी झाले होते. दहा अतिरेक्यांनी ओबेराय ट्रायडन्ट हॉटल व लिओपोल्ड कॅफे व कामा-अल्बलेस रुग्णालय, मेट्रो सिनेमा, सीएसटी व छबाड हाउस येथे हल्ला केला होता.