News Flash

अमेरिकी युवकाची सुटका दृष्टिपथात

जन्माने श्रीलंकन असलेल्या अमेरिकी नागरिकाला विनोदी दृश्यफीत यूटय़ूबवर टाकल्यानंतर त्याला संयुक्त अरब अमिरातीने गेले नऊ महिने

| January 9, 2014 12:40 pm

जन्माने श्रीलंकन असलेल्या अमेरिकी नागरिकाला विनोदी दृश्यफीत यूटय़ूबवर टाकल्यानंतर त्याला संयुक्त अरब अमिरातीने गेले नऊ महिने तुरुंगात टाकले असून त्याची सुटका लवकरच होण्याची शक्यता आहे, असे एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जेन साकी यांनी सांगितले, की २९ वर्षे वयाच्या शेझान ऊर्फ शेझ कासिम याला एक वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली होती, त्याचे तुरुंगवासातील काळात त्याचे वर्तन चांगले राहिल्याने त्याची सुटका करण्यात येणार असल्याचे संकेत आम्हाला मिळाले आहेत.
कासिम याला मायदेशी पाठवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काही दिवसातच तो अमेरिकेत परतेल. कासिमला अबुधाबी येथील अमेरिकी दूतावासाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 12:40 pm

Web Title: american held in uae over video to be released
Next Stories
1 फरार कैद्याला थंडीने भरली हुडहुडी, पोलिसांना गेला शरण!
2 जम्मू-काश्मीर विधानसभेचे व्ही. के. सिंग यांना समन्स
3 पाकिस्तान हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र नाही- रॉबर्ट गेट्स
Just Now!
X