News Flash

पाकिस्तानने दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेत – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेला स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचा तर भारताला स्टॅच्यु ऑफ युनिटीचा अभिमान आहे.

जगातील सर्वात मोठे स्टेडिअम असलेल्या सरदार पटेल स्टेडिअमवर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे

– भारताच्या स्वातंत्र्यात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या साबरमतीच्या किनाऱ्यावर तुम्ही आहात.
– विविधतेने भरलेल्या भारतामध्ये तुम्ही आहात जिथे शेकडो भाषा बोलल्या जातात.
– स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचा तर भारताला स्टॅच्यु ऑफ युनिटीचा अभिमान आहे.
– भारत-अमेरिका मैत्री अधिक बळकट झाली, ट्रम्प यांचा दौरा नवीन अध्याय आहे.
– ट्रम्प खूप मोठा विचार करतात आम्ही त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन करतो.

– ट्रम्प यांनी फक्त भारताचा गौरव वाढवलेला नाही तर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचा सन्मान वाढवला आहे.
– हे जगातील सर्वात मोठा स्टेडिअम आहे. मी गुजरात क्रिकेट असोशिएशनचे आभार मानतो.

– भारत आमचा खरा मित्र आहे हे ट्रम्प पहिल्या भेटीत व्हाईट हाऊसमध्ये म्हणाले होते.

– अमेरिकेप्रमाणे भारतात परिवर्तनासाठी आधीरता आहे. मोठे लक्ष्य ठेऊन ते पूर्ण करणे ही भारताची ओळख आहे.
– आम्ही १५०० जुने कायदेच रद्द केलेले नाहीत तर, वेळेच्या गरजेनुसार नवीन कायदेही बनवले आहेत.

– संरक्षण, ऊर्जा, आरोग्य, आयटी प्रत्येक क्षेत्रात भारत-अमेरिका मैत्रीचा विस्तार होत आहे.
– डिजीटल इकोनॉमीचा विस्तार अमेरिकेसाठी गुंतवणूकीची नवीन दालने खुली होणार आहेत.

– भारत आणि अमेरिका नैसर्गिक मित्र आहेत. इंडो-पॅसिफीक क्षेत्रातच नव्हे संपूर्ण जगात शांतता, विकासासाठी एकत्र काम करु शकतो.
– आपण एकत्र येऊन स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतो.

आणखी वाचा – साबरमती आश्रमातील त्या अभिप्राय नोंदवहीत ट्रम्प यांनी लिहिले…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील मुद्दे
– अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे, आम्ही तुमचा आदर करतो म्हणून फर्स्ट लेडी आणि मी आठ हजार मैलावरुन प्रवास करुन आलो आहोत.
– मोदी चॅम्पियन आहेत, माझे खरे मित्र आहेत.

– त्यांना प्रचंड मोठया मताधिक्क्याने निवडून दिले.
– भारतीयांना ठरवले तर ते काहीही करु शकतात, तुम्ही त्याचे प्रतीक आहात.

– भारतातील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे, जास्तीत जास्त लोक इंटरनेटशी जोडले गेले आहेत.
– एलपीजी जास्तीत जास्त घरांमध्ये उपलब्ध आहे, लोक दारिद्रय रेषेच्या बाहेर आले आहेत.
– काही वर्षात गरीबीतून भारत मुक्त होईल. तुम्ही प्रचंड प्रगती करुन पुढे जाणार आहेत.

– भारत एक मुक्त समाज आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये स्वाभाविक मैत्री आहे.
– डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉलिवूडचा उल्लेख केला. भांगडा, शाहरुखच्या डीडीएलजे चित्रपटाचा उल्लेख केला.
– सचिन, विराट कोहलीचे नाव घेतले.

– बॉलिवूडमध्ये वर्षाला २ हजार चित्रपट बनवतात.

– अमेरिकन लष्कर आणि भारतीय लष्करामधील समन्वय युद्ध सरावाने मजबूत करु.

– भारताला ड्रोन विमान देण्याची ट्रम्प यांची घोषणा.

– अल बगदादीला संपवलं, आम्ही एकत्र येऊन दहशतवादाला रोखणार.

– आमच्या देशाला धोका असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश करु देणार नाही, प्रत्येक देशाला हा अधिकार आहे.
– भारत आणि अमेरिका एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला करु.

– पाकिस्तानने दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेत.

– चांद्रयान मोहिमेचा उल्लेख केला. अवकाश संशोधनात भारताला सहकार्य करु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 1:55 pm

Web Title: american president donald trump namste trump event at gujarat dmp 82
Next Stories
1 Video: साबरमती आश्रमात ट्रम्प दाम्पत्यानी केली सूत कताई
2 डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या विमानामधला फरक समजून घ्या…
3 “…तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नीबरोबर रांगेत उभं राहून शिवथाळीचा आस्वाद घेतला असता”
Just Now!
X