इराण आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण झालेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वादाचा ठपका इराणवर ठेवला आहे. “इराणच्या हल्ल्यात कोणत्याही अमेरिकनं सैनिकाला हानी पोहोचलेली नाही. अमेरिकेनं घेतलेल्या खबरदारीमुळे कुणालाही या हल्ल्याचा फटका बसला नाही.  सुलेमानी अनेक दहशतवादी कृत्यांचा म्होरक्या होता. त्याने अनेक ठिकाणी रक्तपात घडवून आणला. त्याला अमेरिकेनं वेळीच संपवले आहे. अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही आणि आर्थिक निर्बध घालू,” असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

इराण आणि अमेरिकतील संबंधात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी कमांडर कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकेच्या तळावर बॅलेस्टिक मिसाईल हल्ले केले. अमेरिकेला इराणनं दिलेल्या प्रतित्युत्तरानं अमेरिका आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत मिळत होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन इराणला ठणकावले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले-

इराणने इराकमधील अमेरिकेच्या सैनिकी तळांवर मंगळवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एकही अमेरिकेला कोणतीही हानी पोहोचलेली नाही. कुणीही जखमी झालेलं नाही. अमेरिकेचे सैनिक सुरक्षित आहे. थोडसं प्रमाणात नुकसान झाले आहे. अमेरिकेनं अगोदरच घेतलेल्या खबरदारीच्या उपायांमुळे नुकसानं टळलं.

मी जोपर्यंत अमेरिकेचा अध्यक्ष असेल तोपर्यंत इराणला अण्वस्त्र बनवू देणार नाही. इराणनं तसा प्रयत्न केला तर आर्थिक निर्बध घालू.

अमेरिका अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्र तायर करत आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेकडे उत्कृष्ट लष्कराबरोबरच शस्त्रास्त्रही आहेत. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याचा वापर करणार आहोत. त्याचा वापर करण्याची आमची इच्छा नाही.

मध्य पूर्वेतील आशियात दहशतवाद पोहोचवण्यात इराण अग्रेसर आहे. कासिम सुलेमानी अनेक दहशतवादी कृत्यांचा म्होरक्या होता. त्याने अनेक ठिकाणी रक्तपात घडवून आणला. त्याला अमेरिकेनं वेळीच संपवले आहे. अमेरिकेनं ईसिस सारख्या इस्लामिक दहशतवादी संघटनेलाही संपवलं आहे.

आम्हाला (अमेरिकेला) मध्य पूर्वेतील देशाच्या तेलाची गरज नाही.