हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानी याच्याशी सत्ता संघर्षात तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार मरण पावला, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. मात्र या अफवांवर खुद्द बरदारनेच स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने एक ऑडिओ मेसेज जारी केला आहे. आपण जिवंत आणि ठणठणीत असल्याचं त्याने सांगितलं असून हे बनावट वृत्त असल्याचं सांगितलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून, मुल्ला मोहम्मद हसन अखुंडचा डेप्युटी म्हणून नाव असलेला बरदार राष्ट्रपती भवनात प्रतिस्पर्धी तालिबानी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्याचा दावा करणारी वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. .त्यावर उत्तर देताना बरदार आपल्या ऑडिओ संदेशात म्हणतो की, “गेल्या काही रात्री, मी सहलींवर गेलो आहे. सध्या मी जिथे आहे तिथे आम्ही सर्व ठीक आहोत, माझे सर्व भाऊ आणि मित्र सर्व ठीक आहोत.

“मीडिया नेहमी खोटा प्रचार प्रकाशित करते. म्हणून, ती सर्व खोटे धैर्याने नाकारा, आणि मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की आम्हाला कोणतीही समस्या नाही,” बरदार म्हणाले.

हेही वाचा – महिलांनी बुरखा घालून ऑफिसला जाणंही तालिबानला रुचेना; त्यांचा कमांडर म्हणतो, “जगाने जरी…”

हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले असले तरी या ऑडिओबद्दल आपणही खात्रीशीर सांगू शकत नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

अनेक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री काबूलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. प्रत्यक्षात दोन वरिष्ठ तालिबान नेते – गट सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार आणि अफगाण तालिबान नेता हक्कानी यांच्यात सत्ता संघर्ष होता. नव्या तालिबान नेत्यांमध्ये कथित मतभेदामुळे ही घटना घडल्याची माहिती पसरवली जात आहे. पण खरं म्हणजे अफगाणिस्तानचा नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (एनआरएफ) तालिबानच्या विरोधात कठोर लढा देत आहे जो देशातील शेवटच्या बुरुजावर ताबा घेऊ इच्छित आहे.

तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याचाही बऱ्याच वर्षांपासून मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. यापूर्वी गटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी तो कंदहारमध्ये उपस्थित होता .गेल्या महिन्यात अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर या गटाने त्यांच्या सरकारची औपचारिक घोषणा केली.