News Flash

US ELECTION : हँड सॅनिटायझरमुळे बॅलेट स्कॅनरमध्ये बिघाड

जाणून घ्या नेमकी कुठल्या राज्यात घडली ही घटना

अमेरिकेच्या ४६ व्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस लागली आहे. ही निवडणूक कोण जिंकणार हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. अशात अमेरिकेच्या आयोवा राज्यात बॅलेट स्कॅनरने काम करणंच बंद केलं. मतदारांनी वापरलेल्या हँड सॅनिटायझरच्या आर्द्रतेमुळे स्कॅनरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे आयोवामधील बॅलेट स्कॅनर एक तासासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. न्यूयॉर्क डेलि न्यूजने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मतपत्रिकांमध्ये काहीसा ओलावा निर्माण झाल्याने ही मशीन जाम झाली होती अशी माहिती समोर आली आहे. मशीन बंद पडल्यानंतर हाताने सॅनिटायझरं डिस्पेंसर बाजूला करण्यात आलं जेणेकरून सॅनिटायझर वाळून जाईल आणि मतपत्रिकेला चिकटणार नाही. मतपत्रिकेमध्ये ओलावा तयार झाल्यामुळे मशीन जाम झाली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे.

करोनाचा विळखा अमेरिकेभोवती सर्वात घट्ट आहे. कारण करोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यू यामध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडते आहे. दरम्यान आयोवामध्ये मार्चपासून करोनाचे १ लाख ३५ हजार रुग्ण आढळले आहेत. जो बायडन यांना २३८ इक्लेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१३ व्होट्स मिळाले आहेत. जो बायडन यांनी ट्रम्प यांना २५ व्होट्सने मागे टाकलं आहे. चुरशीच्या या लढतीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसंच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊ असंही त्यांनी म्हटलं आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची धमकी खरी करुन दाखवली आणि मतमोजणी रोखण्यासाठी न्यायालयात गेले तर आमचीही वकिलांची फौज तयार आहे असं प्रत्युत्तर जो बायडन यांनी दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 10:04 pm

Web Title: amid us polling hand sanitiser jams ballot scanner in iowa scj 81
Next Stories
1 बळ आणखी वाढलं! भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमानं दाखल
2 पोलिसांनी मारहाण केल्याची अर्णब गोस्वामींची तक्रार न्यायालयाने फेटाळली; रिमांड सुनावणी सुरू
3 POK हा भारताचाच भाग हे पाकिस्तानने विसरु नये, राजनाथ सिंह यांनी ठणकावलं 
Just Now!
X