केंद्रात नवे सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप नेते अमित शहा, बी. एस. येडियुरप्पा, जे.पी नंदा धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील राजकीय वातावरण बिघडले आहे. या पार्श्वभूमीवरही या नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.  पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी बिहारमधील परिस्थितीबाबत माहिती घेतली आहे. भाजपने सध्या येथे बघ्याची भूमिका घेतली असून, आज सायंकाळी जेडीयूच्या नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. भाजपच्या संसदीय समितीची बैठक २० मे रोजी होणार असून, त्यानंतर पंतप्रधानांच्या शपथविधीचा कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्यादिवशीच एनडीएमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांचीही बैठक बोलाविली आहे.