News Flash

‘अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टीव्ह स्मिथ’, निलंबित भाजपा खासदाराचा टोला

अमित मालवीय यांना पदावरुन हटवलं पाहिजे

भारतीय जनता पक्षाचे निलंबित खासदार किर्ती आझाद यांनी अमित मालवीय यांची तुलना बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथशी केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर टीका करताना अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथ आहे असा टोला किर्ती आझाद यांनी मारला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, किर्ती आझाद यांनी भाजपाने तात्काळ कारवाई करत अमित मालवीय यांना आयटी सेल प्रमुख पदावरुन हटवलं पाहिजे अशी मागणी केली आहे. नेहमी सडेतोडपणे आपलं मत मांडणारे किर्ती आझाद यांनी यावेळी पक्षावर सणसणीत टीका केली आहे.

तुमच्या माहितीसाठी २०१५ मध्ये किर्ती आझाद यांनी दिल्ली क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचा खुलासा केला होता. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षातील नेते अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधत म्हटलं होतं की, ज्यावेळी डीडीसीएमध्ये घोटाळा झाला होता तेव्हा अरुण जेटली अध्यक्ष होते. किर्ती आझाद यांनी पक्षाची मर्यादा ओलांडल्याने तसंच अरुण जेटलींवर टीका केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा किर्ती आझाद यांनी आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्या निमित्ताने पक्षावर टीका केली आहे. किर्ती आझाद यांनी अमित मालवीय यांची तुलना थेट बॉल टॅम्परिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथशी केली आहे.

निवडणूक आयोगाने घोषणा करण्यापूर्वीच भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या सामितीला सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर करण्यासाठी निवडणूक आय़ोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच अमित मालवीय यांनी ट्विटरद्वारे निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 12 मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होईल असं ट्विट मालवीय यांनी केलं होतं. जोरदार टीका व्हायला सुरूवात झाल्यानंतर त्यांनी ते ट्विट डीलिट केलं, आणि त्यानंतर निवडणूक आय़ोगाला पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं, पण त्यांचं स्पष्टीकरण आयोगाल पटलेलं दिसत नाही. कारण आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 12:00 pm

Web Title: amit malviya is steve smith of bjp
Next Stories
1 निवडणूक तारीख फुटीचं मालवीयांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, पण आयोगाला ‘भरोसा’ नाय!
2 दारुच्या नशेत वाहनचालकाने पोलीस कर्मचा-याला चिरडलं
3 Karnataka Assembly Election : द्रविड आणि फेसबुक बजावणार महत्त्वाची भूमिका
Just Now!
X