यापूर्वीच्या यूपीए सरकारने १० वर्षांच्या कार्यकाळानंतर ‘रिकामी तिजोरी’ मागे ठेवली असून त्यामुळे सध्याच्या रालोआ सरकारला गरिबांसाठी काम करणे कठीण झाले आहे, असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी सांगितले.
‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या’ दुसऱ्या टप्प्याची सुरुवात शाह यांच्या उपस्थितीत दाहोद येथे झाली. यावेळी बोलताना शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीमंतांनी स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान सोडून देण्याच्या मोहिमेची तुलना, अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी एका वेळचे जेवण स्वच्छेने सोडण्याबाबत लालबहादूर शास्त्री यांच्या आवाहनाशी केली.
गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शाह यांनी हे विधान केले.