News Flash

“आता उत्तर द्यावंच लागेल”; अमित शाह यांचा ममता सरकारला इशारा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या कारवर बंगालमध्ये हल्ला

पश्चिम बंगालमधील राजकारणाला गुरूवारी हिंसक वळण मिळालं. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर आणि कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भाजपाचे काही नेते जखमी झाल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंबंधी अहवाल मागवला आहे. तसेच, अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारला इशाराही दिला आहे.

“रावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”

“आज बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर हल्ला झाला ही खूपच निंदनीय घटना आहे. या घटनेचा कितीही निषेध करावा तरी कमीच आहे. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या राजकीय पुरस्कृत हिंसेच्या घटनेबाबत बंगालच्या सरकारला आता शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावंच लागेल”, असं ट्विट अमित शाह यांनी केलं.

दरम्यान, जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला असून यामध्ये कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करत काचा फोडल्याचं दिसत आहे. हल्ल्यात पक्षाचे नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाल्याचं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. भाजपा नेते कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

“दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ देत”; भाजपा नेत्याचं जयंत पाटील यांना आव्हान

“आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहेत. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल. मी आज केवळ दुर्गादेवीच्या आशीर्वादानेमुळेच बैठकीत पोहोचू शकलो,” असं हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना नड्डा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 4:39 pm

Web Title: amit shah furious after bjp jp nadda car convoy attacked in west bengal mamta banerjee government on radar vjb 91
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर जे पी नड्डांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
2 यूपीएची ‘पॉवर’फूल खेळी… सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार अध्यक्षपद?
3 “आपली धोरणं आणि राजकारण वेगळं असू शकतं, मात्र…”; मोदींनी करुन दिली आठवण
Just Now!
X