अमित शहा यांचा सल्ला; उत्तर प्रदेश कार्यकारिणीची बैठक

भाजप कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळवला आहे. यशाने हुरळून न जाता कार्यकर्त्यांनी नम्र रहावे, आत्मसंतुष्ट होऊ नका असा सल्ला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपावेळी शहा यांनी मार्गदर्शन केले. उत्तर प्रदेशमधील यशामुळे देशात जातीयवाद, घराणेशाही तसेच तुष्टीकरणाचे राजकारण संपल्याचे शहा यांनी नमूद केले.

सर्वाना बरोबर घेऊनच उत्तर प्रदेशचे सरकार वाटचाल करेल असे आश्वासन पक्षाध्यक्षांनी दिले. केवळ व्यवस्थेत परिवर्तन नव्हे तर जनजीवन सुखकर व्हावे यासाठी हे परिवर्तन आहे. यश मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये घराघरापर्यंत जावे असे आवाहन शहा यांनी केले.  मध्य प्रदेश, छत्तीसगढ व राजस्थान ही राज्ये पक्षाने सत्तेत असताना प्रगतीपथावर नेल्याचे सांगताना, उत्तर प्रदेशातही तसेच काम करुन दाखवू असा निर्धार अमित शहा यांनी व्यक्त केला.

..तर पराभव अशक्य

१६ हजार कार्यकर्ते जर मतदान केंद्र पातळीवर कार्यरत राहतील तर ८० हजार मतदान केंद्रांवर पक्षाची स्थिती भक्कम राहील. त्यामुळे आमचा पराभव करणे अशक्य असे शहा यांनी स्पष्ट केले.

भाजपचे लोकसभेत २८२ खासदार देशात १३८७ आमदार असल्याचे नमूद केले.