केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अहमदाबादमधील के.डी रुग्णालयामध्ये शाह यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शाह यांच्या मानेच्या मागच्या बाजूला असणारी एक गाठ काढण्यात आल्याची माहिती रुग्णालयाने एक परिपत्रक जारी करुन दिली आहे.
अहमदाबादमधील वैष्णवी देवी सर्कलजवळील के.डी. रुग्णालयात शाह यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. यासंदर्भात रुग्णालयाचे व्यवस्थाकीय संचालक अदित देसाई यांनी एक पत्रक काढून माहिती दिली आहे. ‘आज सकाळी नऊच्या सुमारास भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मानेच्या मागील भागावर असणारी गाठ शस्त्रक्रिया करुन काढण्यात आली आहे. त्यांना रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले आहे,’ अशी माहिती या पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
Today @AmitShah had a minor surgery for lipoma at the backside of his neck. He is back home in Ahmedabad after the surgery @IndianExpress pic.twitter.com/3UabUOydAr
— Liz Mathew (@MathewLiz) September 4, 2019
दरम्यान, मंगळवारी रात्रीच अमित शाह यांनी दिल्लीमध्ये जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये विकास कामाला प्राधान्य देण्यासाठी मोदी सरकार सर्व मदत करण्यास तयार असल्याचे यावेळी शाह यांनी स्पष्ट केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 2:21 pm