02 March 2021

News Flash

Disha Ravi Arrest : अमित शहा म्हणतात, ‘गुन्हा ठरवताना वय महत्त्वाचं नसतं!’

दिशा रवीच्या वयावरून दिल्ली पोलिसांना लक्ष्य केलं जात असताना अमित शहांनी दिल्ली पोलिसांची पाठराखण केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (संग्रहित छायाचित्र)

टूलकिट प्रकरणावरून देशात सुरू असलेल्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात २२ वर्षांच्या दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर त्यावरून दिल्ली पोलिसांना लक्ष्य केलं जात होतं. त्याविषयी बोलताना अमित शहांनी दिल्ली पोलिसांचं समर्थन केलं आहे. ‘दिल्ली पोलीस या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करत आहेत. गुन्हा किंवा गुन्हेगार ठरवण्यामध्ये संबंधित व्यक्तीचं वय, लिंग किंवा व्यवसाय महत्त्वाचा कसा ठरू शकतो? या घटकांवरून गुन्ह्याचं स्वरूप कसं ठरवता येईल?’ असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला आहे. दिशा रवीच्या वयामुळे दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली जात आहे.

शेतकरी आंदोलनाच्या आडून कट-कारस्थान करण्यासाठीच्या कथित टूलकिट प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हे टूलकिट ट्वीट केल्यानंतर हा वाद सुरू झाला. हे टूलकिट २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठीची पूर्वतयारी होती या संशयावरून ग्रेटा थनबर्ग, दिशा रवी, शंतनु मुळूक, निकिता जेकब हे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.

‘हा कसला ट्रेंड आहे?’

यावेळी त्यांनी माध्यमांवर देखील टीका केली. ‘हा कसला ट्रेंड आहे, जिथे एखाद्या गुन्ह्याबद्दल बोलताना लोकं संबंधित व्यक्तीचं वय, व्यवसाय किंवा लिंगाविषयी बोलत आहेत? असे अनेक २२ वर्षीय लोकं आत्तापर्यंत अटक झाले असतील. दिल्ली पोलिसांनी काही पुराव्यांच्या आधारावरच अटक केली असेल’, असं ते म्हणाले.

१५ फेब्रुवारीला दिशा रवीला तिच्या बंगळुरूमधल्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. ग्रेटा थनबर्गने ट्वीट केलेल्या टूलकिटचा काही भाग संपादित केल्याचा आरोप तिच्यावर आहे. गुन्हेगारी कारस्थान आणि देशद्रोहाचा गुन्हा यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी दाखल केला आहे. दिशाची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 4:50 pm

Web Title: amit shah says age sex profession doesnt matter in culpability of crime pmw 88
Next Stories
1 ग्रेटा थनबर्गने नासाच्या मंगळ मोहिमेवर साधला निशाणा; म्हणाली, “श्रीमंत देश अब्जावधी रुपये…”
2 राजीव गांधींच्या खास मित्राचे निधन; राहुल यांनी पार्थिवाला दिला खांदा
3 मोदींनी विद्यार्थ्यांना म्हणाले, “एखाद्या समस्येचा भाग व्हायचं की समस्या सोडवणाऱ्यांपैकी व्हायचं हे…”
Just Now!
X