रविवारी शिक्कामोर्तब

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अमित शहा दुसऱ्यांदा विराजमान होण्यास केवळ औपचारिकता शिल्लक आहे. रविवारी शहा यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होईल. भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना पक्षाकडून आज जारी करण्यात आली. येत्या २१ जानेवारी रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे. याच दिवशी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होईल, ज्यात शहा दुसऱ्यांदा पक्षाची सूत्रे ताब्यात घेतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने  अध्यक्ष बदलाच्या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सत्तास्थापनेनंतर ९ जानेवारी २०१४ रोजी शहा पक्षाचे अध्यक्ष झाले होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. त्याची मुदत २३ जानेवारी रोजी संपत आहे. २४ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक अधिकारी अविनाश रॉय खन्ना यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला.