News Flash

अमित शहा यांची आज वाराणशीत जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारणशी लोकसभा मतदारसंघात रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे.

| March 22, 2015 04:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारणशी लोकसभा मतदारसंघात रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. या वेळी मोठय़ा संख्येने जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सपाचे माजी स्थानिक नेते अनिल राजभर यांनी या सभेचे आयोजन केले आहे. रविवारी ते स्वत: भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजभर हे उत्तरप्रदेश नियोजन आयोगाचे सल्लागार होते. सपाचे नेते मुलायमसिंह यांच्या सरकारमध्ये राजभर यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता. पूर्वाचलमधील मागासवर्गीय मोठय़ा प्रमाणावर रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 4:16 am

Web Title: amit shah to address public meeting in varanasi
Next Stories
1 आमदारपुत्र शिपाई पदासाठी रांगेत
2 ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली
3 ‘स्वच्छ भारत’ अभियान कृती दलाचे प्रमुखपद नाकारले – सिद्धरामय्या
Just Now!
X