दक्षिणेतील तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट विजय मिळवला आहे. एकूण ३५ जागांवर अण्णाद्रमुकचे उमेदवार आघाडीवर आहेत. गेल्यावेळी चांगली कामगिरी करणाऱया द्रमुकचा केवळ एकच उमेदवार राज्यात सध्या आघाडीवर आहे.
कर्नाटकमधूनही भाजपच सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष ठरला आहे. राज्यातील २८ जागांपैकी १५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर राज्यात सत्तेवर असणाऱया कॉंग्रेसचे केवळ ११ उमेदवारच आघाडीवर आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे २ उमेदवार राज्यात आघाडीवर आहेत.
देशात बुडण्याच्या स्थितीत असलेल्या कॉंग्रेसला केरळने सावरले आहे. राज्यातील २० जागांपैकी नऊ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आंध्र प्रदेशातील १६ जागांवर तेलगू देशम पक्षाचे तर ११ जागांवर तेलंगणा राष्ट्रसमितीचे उमेदवार आघाडीवर आहेत.