News Flash

खासदार अमरिंदर सिंग पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

अमरिंदर प्रतापसिंग बाजवा यांची जागा घेतील

| November 28, 2015 02:35 am

Amrindar Singh: पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११७ पैकी ७७ जागावंर विजय नोंदवला होता. काँग्रेसने यावर बहुमत मिळवत १० वर्षांनी सत्ता मिळवली होती.

२०१७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंजाब काँग्रेसमध्ये झालेल्या फेरबदलात माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना नवे प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले आहे, तर ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आले आहे.

अमरिंदर प्रतापसिंग बाजवा यांची जागा घेतील. बाजवा यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही घडामोड झाल्याचे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले. या निवडीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानताना, ही अतिशय ‘संवेदनशील’ जबाबदारी असल्याचे बाजवा यांनी म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांना विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीचे अध्यक्ष नेमण्यात आले आहे. लालसिंग यांची वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी, तर साधूसिंग धरमसोट यांची प्रचार समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 2:35 am

Web Title: amrinder singh president of punjab congress
Next Stories
1 चीनमध्ये प्राण्यांच्या क्लोनिंगचे सर्वात मोठे केंद्र
2 वकिलांनी संपावर जाऊ नये सर्वोच्च न्यायालयाचे मत
3 भारतीय इतिहास संशोधक परिषदेचे अध्यक्ष वाय.एस.राव यांचा राजीनामा
Just Now!
X