News Flash

दिग्विजय-अमृता राय विवाहाच्या बंधनात

अमृता राय प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह (६८) यांनी गेल्या महिन्यात चेन्नईत दूरचित्रवाणीवरील सूत्रसंचालक अमृता राय (४४) यांच्याशी विवाह केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दिग्विजयसिंह सध्या अमेरिकेत असून त्यांनी विवाह केल्याच्या वृत्ताला त्यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला आहे. अमृता राय प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

अमृता राय सध्या रजेवर असल्याचे राज्यसभा दूरदर्शन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ‘द संडे एक्स्प्रेस’ला सांगितले. अमृता राय यांच्यासमवेत संबंध असल्याचे दिग्विजयसिंह यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केले होते. राय आणि त्यांच्या पतीने एकमेकांच्या संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर निकाल लागला की आम्ही औपचारिकपणे जाहीर करू, असे दिग्विजयसिंह यांनी ट्वीट केले आहे.
राय यांनीही ट्विटरद्वारे दिग्विजयसिंह यांच्याशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. आपण पतीपासून विभक्त झालो असून संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. दिग्विजयसिंह यांच्या पत्नीचे दीर्घ आजाराने २०१३ मध्ये निधन झाले. त्यांना चार कन्या आणि एक पुत्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 3:52 am

Web Title: amrita rai marry with digvijay singh
Next Stories
1 प्रकाश यांच्याकडून साहित्य अकादमी सन्मान परत
2 हिंदूंना प्रतिगामी ठरवणे, हा तर पुरोगाम्यांचा दहशतवाद!
3 माहिती तंत्रज्ञान क्रांतीपासून अंदमान दूरच, साहित्यप्रेमी रसिकांची नेटवर्कअभावी गैरसोय
Just Now!
X