News Flash

भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्या स्वागतासाठी २८ किलोंचा पुष्पहार

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान मायदेशी परतणार आहेत

भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्या स्वागतासाठी २८ किलोंचा पुष्पहार
भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या स्वागतासाठी २८ किलोचा पुष्पहार

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान मायदेशी परतणार आहेत. वाघा बॉर्डरमागे अभिनंदन भारतात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक वाघा बॉर्डरवर उपस्थित आहेत. सकाळपासून वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अमृतसर येथील तरुणांनी अभिनंदन यांच्यासाठी चक्क २८ किलोंचा पुष्पहार आणला आहे. शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली होती.

अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली . संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

हे आमचे शांततेसाठीचे पहिले पाऊल आहे, असा कांगावा पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका, सौदी अरेबियासह काही देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही सुटका करणे भाग पडल्याचे स्पष्ट होत आहे. भारतानेही ही सुटका म्हणजे तडजोड नसून जोवर अतिरेक्यांवर ठोस कारवाई करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे.

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. यानंतर भारताने त्यांच्या सुटकेसाठी सर्वोपतरी प्रयत्न सुरु केले होते. अखेर भारतीय कुटनीतीला यश आलं आणि पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 1:50 pm

Web Title: amritsar youth with a 28 kilo garland to welcome the wing commander
Next Stories
1 इस्लाम म्हणजे शांतता, अल्लाहच्या ९९ नावातही हिंसाचार नाही: सुषमा स्वराज
2 ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्या शोएब मलिकला हैदराबादकरांचा इशारा
3 खिशाला कात्री; घरगुती सिलिंडर महागला
Just Now!
X