देशभरात प्रसिद्ध असलेल्या अमूल ब्रॅण्डचे दूध महागले असून कंपनीने दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. उद्यापासूनच ही नवी दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे अमूलच्या ग्राहकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.


‘अमूल’ हा गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचा (GCMMF) ब्रॅण्ड आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी सोमवारी (दि.२०) अमूल कंपनीच्या दूधाच्या दरवाढीची घोषणा केली. त्यानुसार, आता उद्यापासून अमूल दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महागणार आहे.

गुजरातमधील ‘आनंद’ या जिल्ह्यात या कंपनीचा प्रकल्प असल्याने त्याला आनंद मिल्क युनिअन लिमिटेड अर्थात अमूल या नावाने ओळखले जाते.