28 February 2021

News Flash

चांद्रयान २ : अमूल म्हणतं “चांद तारोको छुने की आशा!”

अमूलने पोस्ट केलेली जाहिरात अनेकांना भावली आहे

चांद्रयान २ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचा काळजाचा ठोका चुकला. मात्र इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मात्र सगळ्या जगाने कौतुक केले. ज्या दिवशी ही घटना समोर आली त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेंगळुरुमध्येच होते. त्यांनी इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा निरोप घेतला आणि ते गाडी पर्यंत जाऊ लागले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कारपर्यंत सोडायला जाताना के. सिवन यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांना मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिवन यांचे सांत्वन केलं.

या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. नेमका याच भेटीचा संदर्भ उचलून अमूलने एक सुंदर कार्टून रेखाटले आहे. या कार्टूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि के. सिवन हे एकमेकांना भेटत आहेत असे दाखवण्यात आले आहे. तसेच चांद तारो को छुने की आशा! या ओळीही लिहण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर Always Proud म्हणजे इस्रोच्या वैज्ञानिकांचा देशाला कायम अभिमान वाटतो असेही अमूलने म्हटले आहे. अमूलतर्फे कायमच कल्पक कल्पना वापरुन सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या जाहिराती सोशल मीडियावर आणल्या जातात आणि प्रसारितही केल्या जातात. चांद्रयान मोहिमेवरच्या या खास जाहिरातीची सोशल मीडियावर चर्चा होते आहे.

‘The dream lives on… the mission will be accomplished soon!’ स्वप्न सत्यात उतरेल त्याचा प्रवास सुरु आहेच चांद्रयान मोहीम लवकरच यशस्वी होईल अशा आशयाच्या ओळीही अमूलने ट्विटसोबत लिहिल्या आहेत.

ऑर्बिटरने जे फोटो पाठवले आहेत त्यानुसार ठरलेल्या जागेपासून खूप जवळच हे हार्ड लँडिंग झाले आहे. लँडरचे तुकडे झालेले नसून तो एकसंध आहे. फक्त तो एकाबाजूला कललेला आहे असे चांद्रयान-२ मोहिमेशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. लँडरशी पुन्हा संपर्क करण्यासाठी आम्ही आमच्यापरीने सर्व प्रयत्न करत आहोत असे या अधिकाऱ्याने सांगितले. इस्रोच्या आयएसटीआरएसी सेंटरमध्ये एक टीम यासाठी सतत काम करत आहे. चांद्रयान-२ मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे तीन भाग आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 2:31 pm

Web Title: amul posted nice cartoon on chandrayaan 2 scj 81
Next Stories
1 “मोठा नेता व्हायचं असेल तर कलेक्टर, एसपीची कॉलर पकडा”; छत्तीसगडमधील नेत्याचा विद्यार्थ्यांना सल्ला
2 चेन्नई : जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेशचा दहशतवादी अटक
3 के. सिवन यांचे सोशल नेटवर्किंग साईटवर कोणतेही अकाऊंट नाही, इस्त्रोने दिली माहिती
Just Now!
X