News Flash

शीख रेजिमेंटच्या जवानाने दोघा सहकाऱ्यांवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

ही घटना मध्यरात्री दोन वाजता घडली. जसबीर सिंगने हवालदार आणि नाईकवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामागचे कारण समजू शकलेले नाही.

हिमाचल प्रदेशमधील मॅक्लोडगंज येथील १८ शीख रेजिमेंटच्या एका जवानाने आपल्या दोन सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या. नंतर स्वत:वर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली.

हिमाचल प्रदेशमधील मॅक्लोडगंज येथील १८ शीख रेजिमेंटच्या एका जवानाने आपल्या दोन सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या. नंतर स्वत:वर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सैन्यदलाकडून या घटनेचा तपास केला जात आहे. यात इतर दोन जवानांचाही मृत्यू झाला आहे.

आरोपी जवानाचे नाव जसबीर सिंग (वय २१, १८ शीख रेजिमेंट, रा. बर्नाला, पंजाब) असे आहे.

ही घटना मध्यरात्री दोन वाजता घडली. जसबीर सिंगने हवालदार आणि नाईकवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. या गोळीबारामागचे कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार हरदीप सिंग (तरणतारण, पंजाब) आणि नाई हरपाल सिंग (गुरूदासपूर, पंजाब) असे मृत दोघांची नावे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 4:07 pm

Web Title: an army jawan of 18 sikh regiment allegedly shot dead his two colleagues before committing suicide
Next Stories
1 टिळा, टोपीवर देश चालणार नाही, राहुल गांधींच्या शिव भक्तीवर नक्वींचा टोला
2 जगप्रसिद्ध ‘Time Magazine’ ची 19 कोटी डॉलरला विक्री
3 पर्रिकर उपचारासाठी दिल्लीत, गोव्यात काँग्रेस करणार सत्तास्थापनेचा दावा
Just Now!
X