05 December 2020

News Flash

वायव्य पाकिस्तानला भूकंपाचा तीव्र धक्का

वायव्य पाकिस्तान प्रांतात आज (शनिवार) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.० इतकी मोजण्यात आली आहे.

| June 14, 2014 02:40 am

वायव्य पाकिस्तान प्रांतात आज (शनिवार) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के बसले.  रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.० इतकी मोजण्यात आली आहे. पाकिस्तानी हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ अधिकारी मोहम्मद रियाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या वायव्य दिशेला असलेल्या पेशावरसह सर्वच शहरांना या भूकंपाचा धक्का बसला.
या भूकंपामुळे अद्याप कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तान-अफगणिस्तान सीमेवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये, पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भुकंपामुळे ३७६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, अरबी समुद्रात एक नवे बेट तयार झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 2:40 am

Web Title: an earthquake of 6 6 magnitude rocks northwest pakistan
टॅग Earthquake,Pakistan
Next Stories
1 ‘सरदार’ धरणाची उंची वाढणार
2 महिला सुरक्षेवर ‘नि’रुत्तर प्रदेश
3 पर्यटकांत भारतीय ‘उधळपट्टे’
Just Now!
X