अरूणाजल प्रदेशात पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. भारतीय हवामान विभागाच्या मते हे भूकंपाचे हादरे स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.२४ मिनिटींनी जाणवले. रिश्टर स्केलवर ५.५ इतकी तीव्रता नोंदवली गेली. तर भूकंपाचा केंद्रबिंदू अरूणाचल प्रदेशमधील पूर्वेकडील भाग कामेंग होता. सुदैवाने या हादऱ्यामुळे कोणतेही नुकसान झाल्याची नोंद नाही.


शुक्रवारी देखील अरूणाचल प्रदेशातील पूर्व भागास भूकंपाचे हादरे बसले होते. तेव्हा रिश्टर स्केलवर ५.९ इतकी तीव्रता नोंदवली गेली होती. हे हादरे दुपारी दोन वाजून १५ मिनीटांनी बसले होते. तर माध्यमांच्या माहितीनुसार हे हादरे अरूणाजल प्रदेशच्या पूर्वेकडील अन्य भागांमध्येही जाणवले होते.