News Flash

महाराष्ट्रातल्या ५० टक्के करोना बाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू

या विषाणूच्या प्रकाराला B.1.617 म्हटले जात आहे

संग्रहीत

देशभरासह राज्यात सध्या करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले गेलेले कोविडि-19 पॉझिटिव्हच्या ५० टक्के सॅम्पल्समध्ये SARS-CoV-2 नावाचा नवा आणि अत्यंत संसर्गजन्य असा भारतीय प्रकारचा विषाणू आढळला आहे. या विषाणूच्या प्रकाराला B.1.617 म्हटले जात आहे.

यातील बहुतांश नमूने विदर्भातील आहेत आणि मुंबईत शहरातून पाठवण्यात आलेल्या कोणत्याही नमुन्यात आतापर्यंत B.1.617 प्रकारचा विषाणू नाही आढळला. सॅम्पल्सची जिनोमिक सिक्वेंसिगं करणाऱ्या दहा प्रयोगशाळांचा ग्रुप INSACOG शास्त्रज्ञांनी याची माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत संपूर्ण जिनोम सिक्वेंसिगं प्रोजेक्टबद्दल अधिक विस्तृत माहिती दिलेली नाही. शुक्रवारी सांगण्याता आले की गुरूवारी १३ हजार ६१४ नमूने जिनोम सिक्वेंसिंगसाठी दहा INSACOG प्रयोगशाळांना पाठवले गेले होते. मंत्रालयाने सांगितले की, या पैकी १ हजार १८९ सॅम्पल SARS COV-2 प्रकारचे आढळून आले जे भारतात चिंतेचा विषय आहेत. यामध्ये यूके वेरिएंटचे १ हजार १०९, दक्षिण अफ्रिकी वेरिएंटचे ७९ सॅम्पल्स आणि ब्राझील्सचा एका सॅम्पलचा समावेश आहे.

राज्यातून पाठवण्यात आलेल्या सॅम्पल्सच्या रिझल्टची काही माहिती शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टोपेंनी सांगिते की, ”आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या १ हजार १०० नमुन्यांपैकी ५०० नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. आम्ही केंद्र सरकारकडे एक विस्तृत अहवाल मागितला, मात्र सांगण्यात आलं की संशोधन पूर्ण झाल्यावर अहवाल उपलब्ध होईल. नव्या प्रकारचा विषाणू अतिशय संसर्गजन्यशील असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे आम्ही केंद्राकडे एक रिपोर्ट आणि संशोधित मार्गदर्शक तत्वांची मागणी केली आहे.”

राज्यात प्रमुख चिंता भारतीय प्रकारच्या विषाणूबाबत आहे, जो अतिशय संसर्गजन्यशील मानला जात आहे. जगभरातील तज्ज्ञांनी म्हटले आहे की, भारतीय विषाणूमुळेच देशात करोना रूग्ण वाढत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 8:38 pm

Web Title: an indian type of virus was found in 50 per cent of the corona cases in maharashtra msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Corona Crisis: मनमोहन सिंगांचं मोदींना पत्र, पाच कलमी कार्यक्रमाचा सल्ला
2 हलगर्जीपणा भोवला! महाराष्ट्रातील प्रवाशांचे कोविड रिपोर्ट तपासलेच नाही
3 रेल्वेकडे ४००० डब्बे करोना रुग्णांसाठी सज्ज; सरकारनं मागितले तर पुरवणार
Just Now!
X