दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार, एक आंतरराज्यीय शस्त्र तस्करी करणारी टोळी उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत दोन शस्त्र तस्करांना देखील अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून २५ जिवंत काडतूसं व दहा अत्याधुनिक पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या मते बेकायदा शस्त्र तस्करी करणारी ही टोळी अन्य राज्यांमधून शस्त्र घेऊन दिल्लीत येत होती व येथील स्थानिक गुन्हेगारांना जास्त किंमतीत शस्त्रांची विक्री करत होती. याबाबत पोलिसांना मिळाल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली आहे.