मुंबईहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात एका परदेशी महिलेने जबरदस्त धिंगाणा घातला. दारू न दिल्यामुळे तिने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. संबंधित महिला बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने विमानात आधीच दारू प्यायली होती आणि विमानातील कर्मचाऱ्यांकडे तिने आणखी ड्रिंकची मागणी केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी तिला ड्रिंक देण्यास नकार दिल्यानंतर तिचा राग अनावर झाला. तिने कर्मचाऱ्यांना थेट धमकी दिली आणि अत्यंत अर्वाच्च भाषेचा वापर करत तिने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. संबधित महिला रोहिंग्या मुस्लिमांच्या मानवाधिकारासाठीच्या बाजूने लढत आहे. आरोपी महिला आयर्लंडची रहिवासी असल्याचं समजतंय. या प्रकरणात अद्याप एअर इंडियाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, तसंच त्या महिलेची ओळखही सार्वजनिक करण्यात आलेली नाहीये.

एअर इंडियाच्या विमान क्र.AI-131 मध्ये 10 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला असून या व्हिडीओमध्ये संबंधित महिला वारंवार शिव्या देताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ-

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An irish national woman on board air india london mumbai flight verbally abuses the crew after she was refused more wine
First published on: 14-11-2018 at 11:47 IST