25 February 2021

News Flash

नातवाने आजीचे शीर कापून ठेवले डायनिंग टेबलवर, वडिलांनी फोन केला आणि…

मुंबईतील वांद्रे परिसरातील अत्यंत धक्कादायक घटना

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईतील वांद्रे परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ड्रग्जचे व्यसन असलेल्या एका नातवाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. या निर्दयी नातवाने आपल्या आजीचे शीर कापून घरातील डायनिंग टेबलवर ठेवले. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने आजीचे इतर अवयवय कापून घरात इतरत्र फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिव्यसनाधीन असलेल्या या नातावाचे मानिसक संतुलन बिघडलेले असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिस्तोफर डायस (वय-२५)असे आजीची निर्घृण हत्या करणाऱ्या नातावचे नाव आहे. तो रोझी डायस या त्याच्या आजी समवेत राहत होता. सोमवारी रात्री आजी झोपलेली असताना, त्याने तिचा गळा चिरून हत्या केली. यानंतर आजीचे शिर कापून घरातील डायनिंग टेबलवर ठेवले व शरीराचे अन्य अवयवय कापून घरात इतरत्र फेकले.

ख्रिस्तोफरला ड्रग्जचे व्यसन जडलेले असल्याने, त्याला या अगोदर नशामुक्ती केंद्रातही पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी जवळपास दीड वर्षे राहिल्यानंतर तो घरी परतला होता. आजीची हत्या केल्यानंतर त्याने याबाबत गोव्यात असलेल्या आपल्या वडिलांना फोन करून कळवले. त्यानंतर त्याचे वडिल मुंबईत आल्यावर घडलेला प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. आपण आजीचा खून केला असल्याचे त्यांने वडिलांना अगदी हसत हसत सांगितले. यानंतर त्याला अटक करण्यात आली व गुन्हा नोंदवण्यात आला. न्यायालयाने त्याला पोलीस कोठवडी सुनावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 4:15 pm

Web Title: an old woman was murdere allegedly by her grandson msr 87
Next Stories
1 ज्याच्याकडे ५६ इंची छाती, तोच करु शकतो गरीबांची सेवा – जे. पी. नड्डा
2 आयटी इंजिनिअर्ससाठी गुड न्यूज! टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोमध्ये महाभरती
3 “भगतसिंह कोश्यारी धर्मनिरपेक्ष आहेत ना? हे पंतप्रधानांनी तपासण्याची गरज”
Just Now!
X