पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारताने अवघ्या १२ दिवसांमध्ये पाकिस्तानला जोदरात उत्तर दिले आहे. बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला केला. एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज-२००० विमाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात मिराज-२०० विमानांनी १००० किलो वजनाचे बॉम्ब जैश ए मोहम्मदच्या तळांवर फेकले. या हल्ल्यामध्ये सहभागी झालेल्या मिराज-२०० विमाने ही मागील दोन वर्षांपासून देशातील सर्वात मोठ्या आणि आगरा लखनऊ द्रुतगती महामार्गावर उतरवण्याची प्रात्यक्षिक पाहायला मिळाली होती. या हल्ल्याच्या वृत्तानंतर अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही आनंद व्यक्त करताना सर्व वैमानिक सुखरुप परत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी साडेअकराच्या सुमार घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल औपचारिक घोषणा केली. मात्र सकाळपासूनच अनेक वृत्तसंस्थांनी तसेच वृत्तवाहिन्यांनी भारताने पाकिस्तानला उत्तर दिल्याच्या बातम्या चालवल्या. यावर नंतर भारतीय अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब करत दहशतवाद्यांकडून संभाव्य हल्ल्याशी शक्यता लक्षात घेत हे तळांवर हल्ला केल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्याआगोदरपासूनच सोशल नेटवर्किंगव या हल्ल्यावर चांगलीच चर्चा सुरु झाली. औपचारिक पत्रकार परिषदेआधीच अनेक बड्या व्यक्तींनी ट्विट करुन पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचे कौतूक केले.

आनंद महिंद्रांनीही या हल्ल्यासंदर्भात आनंद व्यक्त केला. मात्र आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘हल्ल्यासाठी गेलेली भारतीय हवाई दलाची १२ मिराज-२००० विमाने सुखरुप परत आली. मुळाच हेच एक मोठे यश आहे. चला आपल्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या या विरांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करुयात.’

दरम्यान पुलावामा हल्ल्यानंतर १२ व्या दिवशी भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या तिन्ही तळांवर १२००० किलो वजनाचे बॉम्ब भारतीय हवाई दलाने फेकले. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात भारतीय हवाई दलाला यश आले.