गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदावर बसणाऱया त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. गुजरातच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांनी आनंदीबेन पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
गेल्या १२ वर्षांपासून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असणाऱया नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. मोदी येत्या सोमवारी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. मोदींच्या राजीनाम्यानंतर गुजरातमधील भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी आनंदीबेन पटेल यांची निवड करण्यात आली. स्वतः मोदी यांनीच आनंदीबेन पटेल यांच्या नावाची शिफारस केली होती. गुजरातमधील मोदींच्या सरकारमध्ये आनंदीबेन पटेल महसूलमंत्री म्हणून कार्यरत होत्या.