बॉलिवूडमधील अॅक्शन दिग्दर्शक परवेज खान यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ५५व्या वर्षांचे होते. त्यांनी दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या ‘अंधाधुन’ आणि ‘बदलापूर’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. परवेज यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
परवेज खान यांना अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्यानं मुंबईमधील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती परवेज खान यांच्यासोबत काम करणारे निशांत खान यांनी पीटीआयला दिली होती. सोमवारी सकाळी त्यांना रुग्णालयता दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून परवेज खान यांचे निधन झाल्याचे सांगितले.
‘परवेज खान यांना सोमवारी सकाळी हृदय विकाराचा झटका आला आणि मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांच्यावर काळानं झडप घातली. त्यांना आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास नव्हता. पण रविवारी रात्री त्यांचं डोकं दुखत होते’ असे निशांत यांनी म्हटलं आहे.
चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी ट्विट करत परवेज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परवेज आणि हंसल यांनी शाहिद या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांनी ट्विटमध्ये ‘नुकतच कळाले की अॅक्शन दिग्दर्शक परवेज खान यांचं निधन झालं आहे. आम्ही दोघांनी शहिद चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यांनी एका टेकमध्ये शूट केले होतं. ते अतिशय चांगले व्यक्ती होते’ असे म्हटलं आहे.
Just heard that action director Parvez Khan is no more. We had worked together in Shahid where he executed the riots sequence in a single take. Very skilful, energetic and a good man. RIP Parvez. Your voice still rings in my ears!
— Hansal Mehta (@mehtahansal) July 27, 2020
परवेज यांनी करिअरची सुरुवात अॅक्शन दिग्दर्शक अकबर बक्शी यांना असिस्ट करत केली होती. त्यांना अकबर यांनी अक्षय कुमारचा चित्रपट खिलाडी, शाहरुख खानचा बाजीगर आणि बॉबी देओलचा सोल्जर या चित्रपटासाठी असिस्ट केले होते. २००४ मध्ये त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्यासोबत काम केले. त्यानंतर परवेज यांनी श्रीराम राघवन यांच्यासोबच जॉनी गद्दार, एजंट विनोद, बदलापूर आणि अंधाधुन या चित्रपटांसाठी काम केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 11:52 am