आंध्र प्रदेशातील वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकारने राज्य विधीमंडळातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवडा अमरनाथ यांनी ही माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या वरिष्ठ सभागृहाच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
YSRCP MLA Gudivada Amaranth to ANI: Andhra Pradesh cabinet approves the decision to abolish the legislative council. pic.twitter.com/KZVNrHf4Oy
— ANI (@ANI) January 27, 2020
आंध्र प्रदेशच्या विधीमंडळाचे खंडीत झालेले हिवाळी अधिवेशन सोमवारपासून पुन्हा सुरु होत आहे. राज्यात १७ डिसेंबरपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने विधान परिषद संपुष्टात आणण्याचा ठराव मंजूर केला.
दरम्यान, सत्ताधारी वायएसआर काँग्रेस वेगळेच धोरण राबवित आहे. ज्यामध्ये विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टीच्या (टीडीपी) विधान परिषदेच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वायएसआर काँग्रेसने यापूर्वीच टीडीपीमध्ये फूट पाडत दोन विधान परिषदेच्या आमदारांना पक्षापासून वेगळं केलं आहे.
जर हीच परिस्थिती कायम राहिली तर वायएसआर काँग्रेस विधान परिषदेत २०२१ मध्येच बहुमत सिद्ध करु शकते. जेव्हा विरोधी पक्षाचे अनेक सदस्य सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर निवृत्त होतील. वायएसआर काँग्रेसचे ५८ सदस्यीय विधान परिषदेत केवळ नऊ सदस्य आहेत. त्यामुळे सरकारला राज्याच्या तीन राजधान्या बनवण्याच्या योजनेला मंजुरी मिळवण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 12:02 pm