देशात प्राणघातक करोना व्हायरचा कहर अद्याप अजूनही सुरू आहे. अशातच करोनासंदर्भात आंध्र प्रदेशातीस एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. आंध्र प्रदेशात बुधवारी करोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने पोलिसांनी १५ महिन्यांपासून घरातच अडकलेल्या एका कुटुंबाची सुटका केली. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील कडाली गावचे आहे. गावच्या सरपंचांच्या म्हणण्यानुसार, करोनामुळे शेजार्‍याच्या मृत्यूनंतर ५० वर्षीय रूथम्मा यांनी पत्नी आणि दोन मुलांना घरातच बंदिस्त केले होते.

कसे उघड झाले प्रकरण?

सरकारी योजनेंतर्गत निवासी भूखंड वाटपासाठी जेव्हा गावातील एक स्वयंसेवक त्याच्या घरी गेला तेव्हा ही बाब उघडकीस आली. या स्वयंसेवकांनी गावातील सरपंच व इतर लोकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावचे सरपंच व बाकीचे गावकरी पोलिसांकडे गेले.

कुटुंबातीस सर्वांची प्रकृती खालावलेली

कडोली गावच्या सरपंचांनी सांगितले की करोनामुळे शेजाऱ्याच्या मृत्यूनंतर रुथम्मा नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांना घरात बंदिस्त केले. त्यावेळी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची सुटका केली तेव्हा सर्वांची प्रकृती खालावलेली होती. जेव्हा कोणी आरोग्य कर्मचारी त्याच्या घरी जात असत तेव्हा त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही असे सरपंचांनी सांगितले.

हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.. यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि कुटुंबीयांना बाहेर काढले. कुटूंबाची परिस्थिती अत्यंत वाईट होती, बर्‍याच दिवसांपासून त्यांना आंघोळही केली नव्हती . पोलिसांनी घाईने कुटुंबातील सर्व सदस्यांना सरकारी रुग्णालयात नेले, जिथे आता सर्वांवर उपचार सुरू आहेत. सरपंचांच्या म्हणण्यानुसार हे कुटुंब आणखी दोन ते तीन दिवस घरात बंद राहिले असते तर कदाचित कोणीही वाचले नसते.

सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू

पोलिसांनी सध्या कुटुंबातील सर्वांना रुग्णालयात दाखल केले आहे, जिथे त्यांचा उपचार सुरु आहेत. या लोकांनी आंघोळ केली नव्हती आणि त्यांचे केसही कापले नव्हते असे पोलिसांनी सांगितले आहे.