शेतातली काम आटोपून संध्याकाळी घराकडे निघालेल्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळून १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम भागात हा अपघात घडला आहे. मृत १३ व्यक्तींमध्ये ११ महिला शेतमजुरांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरचा चालक व मदतनीसही मृत्यूमुखी पडला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या महिला संध्याकाळी आपलं काम आटोपून घराकडे निघाल्या होत्या. अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये ३० जणं प्रवास करत होते. चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट जवळ असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन आदळला. हा अपघात इतका मोठा होता की विजेची तार कोसळून थेट ट्रॅक्टरवर पडली, ज्यात १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उर्वरित व्यक्तींना यात किरकोळ जमखा झालेल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 9:41 pm