22 January 2021

News Flash

एका रात्रीत चंद्राबाबू नायडूंचा बंगला पाडला, मुख्यमंत्री रेड्डींची कारवाई

'प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती.

आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा ‘प्रजा वेदिका’ हा अलिशान बंगला पाडण्यात आला आहे. आतापर्यंत या इमारतीत चंद्राबाबू राहत होते. काही दिवसांपूर्वीच चंद्राबाबूंनी मुख्यमंत्री रेड्डी यांनी पत्र लिहून ही इमारत पाडू नये व या इमारतीस विरोधी पक्ष नेत्याचे शासकीय निवासस्थान घोषित करावे, अशी मागणी केली होती. शनिवारी रेड्डी सरकारने नायडू राहत असलेली ही इमारत ताब्यात घेतली. सोमवारी जगनमोहन रेड्डींनी याच इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची घोषणा केली होती.

‘प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती. त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई करुन अवैध बांधकामांविरोधातील अभियान राबवले जाईल, असे जगनमोहन रेड्डी म्हणालेत.’ चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष असलेल्या तेलगू देसम पार्टीने याला सूड बुद्धीने केलेली कारवाई असे म्हटले आहे. टीडीपीने आरोप केला आहे की, सरकारने माजी मुख्यमंत्र्याबद्दल जरा देखील आदर दाखवल नाही.

जेव्हापासून आंध्र प्रदेशचे प्रशासन हैदराबादहून अमरावतीत स्थलांतरित झाले. तेव्हापासून कृष्णा नदी काठी उंदावल्लीतील या इमारतीत माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राहत होते. हैदराबाद आता तेलंगणची राजधानी आहे.

प्रजा वेदिका इमारतीची उभारणी आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणाद्वारे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या रूपात करण्यात आली होती. यासाठी तब्बल पाच कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. चंद्राबाबू नायडू या ठिकाणीच पक्ष नेत्यांच्या बैठकी घेत असत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 9:01 am

Web Title: andhra pradesh demolition of praja vedike building is underway in amaravati nck 90
Next Stories
1 गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणूक
2 केरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
3 काँग्रेसने देशाचा आत्मा चिरडला!
Just Now!
X