24 October 2020

News Flash

आंतरजातीय विवाहासाठी ४१ हजार कोटींची तरतूद, जगन मोहन सरकारचा निर्णय

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने आज त्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने आज त्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या असून आंध्र प्रदेशमधील जनतेला सरकारने अनेक गिफ्ट दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्पात आंतरजातीय विवाहासाठी ४१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली. राज्य सरकारने या निर्णयामुळे आंध्र प्रदेशमध्ये आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढेल, अशी शक्यता वर्तवली आहे. आंध्र प्रदेशात गेल्या काही महिन्यात आंतरजातीय विवाहातून हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याआधी गतवर्षी आंतरजातीय विवाहासाठी चंद्रान्ना पेल्ली कनुका अशी योजना सुरु केली होती. या योजनेनुसार अनुसुचीत जातीच्या मुलाने अनुसुचीत जातीच्या मुलीसोबत लग्न केलं तर सरकारकडून ४० हजार रुपयांची मदत दिली जात होती. तसंच इतर मागासवर्गीय मुलाने इतर मागासवर्गीय मुलीसोबत लग्न केलं तर सरकारकडून ३० हजार रुपये दिले जात होते. पण आता या रकमेत वाढ केली जाऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 5:31 pm

Web Title: andhra pradesh jagan mohan reddy government budget 41 crore for intercase marriage sgy 87
Next Stories
1 नवऱ्याने स्वस्त फोन दिला म्हणून तिने केली आत्महत्या­­
2 पाकिस्तानी मंत्र्याने केले धोनीचा अपमान करणारे ट्विट, म्हणाला…
3 प्रवासातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने पतीचा मृत्यू, कंडक्टरने मृतदेहासोबत महिलेला खाली उतरवलं
Just Now!
X