19 September 2020

News Flash

अमेरिकेत शिकायला गेलेला आंध्रचा विद्यार्थी ‘आयसिस’च्या दृश्यचित्रफितीत

भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेला एक विद्यार्थी आयसिसच्या एका चित्रफितीत दिसला आहे.

| May 29, 2016 12:06 am

भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेला एक विद्यार्थी आयसिसच्या एका चित्रफितीत दिसला आहे. याबाबतचे वृत्त द डेक्कन क्रॉनिकलने दिले असून आंध्र प्रदेशातून टेक्सास येथे शिकण्यासाठी हा विद्यार्थी गेला होता. आयसिसने जारी केलेल्या व्हिडिओत हा विद्यार्थी भारतात हल्ले करण्याच्या धमक्या देताना दिसला आहे.
मूळचा आंध्रातील असलेला हा विद्यार्थी टेक्सास येथे अभियांत्रिकीचा अभ्यास करतानाच आता आयसिसच्या व्हिडिओत दिसला आहे त्यामुळे भारतासाठीही ही धक्कादायक बाब मानली जात आहे. व्हिडिओ म्हणजे दृश्यचित्रफीत ही २२ मिनिटांची असून ती आयसिसने १९ मे रोजी जारी केली आहे, त्याबाबत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चौकशी करीत आहे.
या व्हिडिओत इतरही काही भारतीय असून त्यांची नावे महंमद साजिद उर्फ बडा साजिद, फारूख अल हिंदी उर्फ अबु राशीद (दोघेही रा. आझमगड उत्तर प्रदेश), अबू सल्हा अल हिंदी, फहद शेख उर्फ अबू अम्मर अल हिंदूी (कल्याण, महाराष्ट्र), अमन तांडेल उर्फ अबू सलमान अल हिंदी व शहीम टांकी (ठाणे) यांचा त्यात समावेश असल्याचे त्या वृत्तपत्राने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:06 am

Web Title: andhra pradesh student in texas identified in isis video
टॅग Isis
Next Stories
1 संयुक्त राष्ट्रांत योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव करणार
2 येमेनमध्ये ‘आयसिस’शी संबंधित सात संशयितांना अटक
3 राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून पी. चिदंबरम यांना उमेदवारी
Just Now!
X