रशियाच्या एका लष्करी ताफ्याने केलेल्या युक्रेनवरील कथित ‘आक्रमणा’च्या पाश्र्वभूमीवर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल शनिवारी युक्रेनची राजधानी क्यीव्हमध्ये दाखल झाल्या.
रशियाचे काही ट्रक शुक्रवारी युक्रेनची हद्द ओलांडून आत शिरले होते. युक्रेनमधील रशियाधार्जिण्या लुगान्स्क येथे बंडखोरांना मदत पोहोचविण्यासाठी हे ट्रक युक्रेनच्या हद्दीत शिरले आहेत. रशियाने हे ‘मदतीचे ट्रक’ आहेत, असे भासवले असले तरी हे आमच्यावरील ‘आक्रमण’ असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या धामधुमीच्या पाश्र्वभूमीवर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल युक्रेनमध्ये येऊन दाखल झाल्या आहेत. युक्रेनचे विद्यमान सरकार पश्चिम युरोपशी जवळीक असलेले आहे. विद्यमान अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को पश्चिम युरोपीय राष्ट्रांशी विशेष जवळीक साधून आहेत. आणखी तीन दिवसांनंतर शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार आहेत.