News Flash

प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने भररस्त्यात जाळून टाकले ५ लाख रुपये

मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये एका प्रियकराने प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने तब्बल पाच लाख रुपये जाळून टाकल्याची घटना घडली आहे

आपल्या प्रेयसीबोत लग्न करण्यासाठी त्याने ६ लाख ७४ हजार रुपयांची चोरी केली होती. पण जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने संतापाच्या भरात पाच लाख रुपयांच्या नोटा चक्क जाळून टाकल्या. मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये ही अजब घटना घडली आहे. जितेंद्र गोयल असं या प्रियकराचं नाव असून एका फायनान्स कंपनीत तो कॅशिअर म्हणून काम करत होता. आपल्याच कंपनीच्या लॉकरमधून त्याने ही चोरी केली होती. पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयलने १८ एप्रिलला कंपनीच्या लॉकरमधून ६ लाख ७४ हजार रुपये चोरले होते. मॅनेजरला चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

‘कसून चौकशी केली असता, गोयलने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पैसे चोरल्याची कबुली दिली. पण जेव्हा त्याने तिच्याशी संपर्क साधला तेव्हा आपण दुसऱ्यासोबत लग्न करत असल्याचं तिने सांगितलं’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेयसीने नकार दिल्याने गोयलचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्याकडील पाच लाख रुपये जाळून टाकले. पोलिसांनी त्यातील काही नोटा मिळवल्या आहेत.

आपण आत्महत्या करणार होतो असंही त्याने पोलिसांना सांगितलं. ‘आम्ही जाळून टाकण्यात आलेल्या पाच लाखांच्या नोटा हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये ५०० च्या नोटा जास्त आहेत. राहिलेले पैसेही त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे’, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 7:29 pm

Web Title: angry lover burn five lakh rupess after she refused to get married
Next Stories
1 ब्रिटनमधील ध्वज अवमान प्रकरणी भारताने केली कायदेशीर कारवाईची मागणी
2 सरन्यायाधीशांवर महाभियोग ही काँग्रेसची राजकीय खेळी – अरूण जेटली
3 भारतातील श्रीमंत व्यक्ती देश सोडून चालले, हिरानंदानींनीही नागरिकत्व सोडले
Just Now!
X